Moshi : घराजवळ पार्क केलेली दुचाकी चोरीस

एमपीसी न्यूज – घराजवळ पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना संतनगर, मोशी येथे घडली.

बाबासाहेब नानासाहेब मुठे (वय 47, रा. संतनगर, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ते 9 डिसेंबर दरम्यान फिर्यादी बाबासाहेब यांनी त्यांची आठ हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम एच 17 / आर 8487) घराजवळ पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. याबाबत पोलीस हवालदार डी. बी. रणसौर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.