Moshi : भरधाव वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव वेगात चालवून तरुणाला धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 12) गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे झाला.

रंजित जयदेव कोकाटे (वय 28, रा. वडगाव कोल्हाटी, औरंगाबाद) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार रणसौर यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकाटे हे पुणे-नाशिक महामार्गावरून जात होते. त्यावेळी मोशी येथे आरोपी याच्या भरधाव वाहनाने कोकाटे यांना धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने कोकाटे यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.