Mumbai : धक्कादायक; ‘मातोश्री’जवळील चहावाल्याला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाजवळील एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या वृत्ताला मुंबई महापालिकेने दुजोरा दिला आहे.

तसेच या बाबतचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. वांद्रे पूर्व येथील कलानगरमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान आहे. कोरोनाची लागण झालेला चहावाला कलानगरच्या प्रवेशद्वाराजवळच चहा विक्री करतो.

दरम्यान, कोरोनाचे लोण मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानाजवळ पोहोचल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.