_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Mumbai News : मालाड मध्ये इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू,7 जण गंभीर जखमी

0

एमपीसी न्यूज : मुंबईतील  मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहे. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.  

मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात ही दुर्घटना घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली.

_MPC_DIR_MPU_II

यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकाने मृतांसह गंभीर जखमींची यादी जाहीर केली आहे.

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांची यादी

1. साहिल सर्फराज सय्यद (पु) – 9 वर्ष
2. अरिफा शेख- 8 वर्ष
3. अज्ञात (पु) – 40 वर्षे
4. अज्ञात (पु)- 15 वर्षे
5. अज्ञात (स्त्री)- 8 वर्षे
6. अज्ञात (स्त्री) – 3 वर्षे
7. अज्ञात (स्त्री) – 5 वर्षे
8. अज्ञात (स्त्री) – 30 वर्षे
9. अज्ञात (स्त्री) – 50 वर्षे
10. अज्ञात (पु) – 8 वर्षे
11. जॉन इराना- 13 वर्ष

मालाड इमारत दुर्घटनेतील जखमी

  1. मरी कुमारी रंगनाथ- वय वर्ष 30
  2. धनलक्ष्मी बेबी- वय वर्ष 56 (प्रकृती स्थिर)
  3. लीम शेख- वय वर्षे 49 (प्रकृती स्थिर )
  4. रिजवाना सय्यद- वय वर्ष 33(प्रकृती स्थिर)
  5. सूर्य मनी यादव- वय वर्षे 39 (प्रकृती स्थिर)
  6. करीम खान वय वर्ष- 30 (प्रकृती स्थिर)
  7. गुलजार अहमद अन्सारी- वय वर्ष 26 (प्रकृती स्थिर)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment