Mumbai News : नवाब मलिक यांची संपत्ती जप्त

एमपीसी न्यूज – राष्ट़्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या संपत्ती ईडीने जप्त केली आहे. नवाब मलिक यांच्या आठ संपत्तींवर ईडीने टाच आणली आहे. जप्त केलेल्या मालमत्ता बहुतांश मुंबईतील आहेत.यामध्ये कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा,उस्मानाबादमधील 148 एकर जमिनीचा समावेश आहे.

ईडीने नवाब मलिक यांच्याविरोधात मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ईडीने फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. दाऊद गॅंगबरोबर मलिक यांच कनेक्शन असल्याचा ईडीचा आरोप आहे. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

नवाब मलिक यांच्या कोणत्या मालमत्तांवर टाच

कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा

कुर्ला पश्चिमेतील तीन फ्लॅट्स

कुर्ल्यातील गोगावाला कम्पाऊंड

वांद्रे पश्चिमेतील दोन फ्लॅट्स

उस्मानाबादमधील 148 एकर जमीन

23 फेब्रुवारीपासून मलिक अटकेत

ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. दाऊदच्या हस्तकांशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार केलेल्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ईडीला तपासात आढळले आहे. त्यानुसार कारवाई करीत नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली.

ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करीत पीएममएलए न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आपली सुटका करावी अशी मागणी करणारी फौजदारी याचिका नवाब मलिक यांनी दाखल केली होती. परंतू उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्याने नवाब मलिक यांनी सुप्रिम कोर्टाच दार ठोठावल आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.