Mumbai: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 335, मृतांचा आकडा 13 वर, 41 रुग्ण झाले कोरोनामुक्त!

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येचे अर्धशतक

एमपीसी न्यूज – मुंबईत आज कोरोनाचे 30 नवीन रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 335 वर पोहचली आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने अर्धशतक पूर्ण केले आहे. राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 13 झाला आहे. दरम्यान, उपचारांनंतर कोरोनाचे 41 रुग्ण पूर्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात एकूण 705 जण विविध रुग्णालयांमध्ये भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6456 नमुन्यांपैकी 335 जणांचे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत 41 कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 24818 व्यक्ती अलगीकरणात असून 1828 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांची संख्या दिली आहे.

मुंबई 181 (9)

पुणे जिल्हा 50 (1)

सांगली 25 (0)

ठाणे मंडलातील इतर मनपा व जिल्हे 36 (2)

नागपूर 16 (0)

अहमदनगर 8 (0)

यवतमाळ 4 (0)

बुलडाणा 4 (1)

सातारा 2 (0)

कोल्हापूर 2 (0)

औरंगाबाद 1 (0)

रत्नागिरी 1 (0)

सिंधुदुर्ग 1 (0)

गोंदिया 1 (0)

जळगाव 1 (0)

नाशिक 1 (0)

इतर राज्य (गुजरात) स्थलांतरीत 1 (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.