Pimpri  news : महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली कांबळे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या  खिंवसरा पाटील रूग्णालयातील  वैद्यकीय अधिकारी डाॅ. वृषाली कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 38 होते. शिर्डी येथील रूग्णालयात रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महापालिकेच्या खिंवसरा पाटील रूग्णालयात  वैद्यकीय अधिकारी म्हणून डाॅ. वृषाली कांबळे कार्यरत होत्या. काही कामानिमित्त त्या शिर्डी येथे गावी गेलेल्या होत्या. आजारपणामुळे शिर्डी येथील रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. उपचार घेत असताना रविवारी त्यांचे निधन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.