Pune News : महापालिकेच्या स्थायी समितीची आज बैठक; भाजपच्या सदस्यांना व्हीप

एमपीसी न्यूज – पुढील महिन्यात पुणे महानगरपालिकेची मुदत संपणार आहे. त्यात आज पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सुमारे दिड हजार कोटींचे विषय येण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या महत्त्वकांक्षी असलेल्या अनेक प्रकल्पांना आजच्या बैठकीत मान्यता देण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन वेळी दगाफटका होऊ नये यासाठी भाजप कडून सदस्यांना व्हिप जारी करण्यात आला आहे.

सहा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहेत. आपल्या या दौर्‍यात ते विविध प्रकल्पाचे उद्घाटन तर काही प्रकल्पाचे भूमिपूजन ही करणार आहेत. यातीलच काही प्रकल्पांच्या निविदा आज होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीसमोर मान्यतेसाठी येणार आहेत. आज स्थायी समितीसमोर सादर होणाऱ्या विषयांमध्ये प्रामुख्यने नदी सुधार प्रकल्प आणि नदी पुन्नरोजीवन प्रकल्प (जायका)चा समावेश आहे. नदी सुधार प्रकल्पांतर्गत 350 कोटींची निविदा स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी येणार असल्याची माहिती आहे.

बहुचर्चित जायका प्रकल्पाची निविदा यापूर्वीच स्थायी समिती समोर मांडण्यात येणार होती. परंतु काही कारणास्तव ही निविदा मारण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आज हा विषय स्थायी समिती समोर येण्याची शक्यता आहे. 1473 कोटींचा असलेला हा प्रकल्प नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आहे. त्याचबरोबर पीपीपी रस्त्याची दोन 108 कोटींच्या निविदासुध्दा मान्यतेसाठी येतील.

आज होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत दगाफटका होऊ नये यासाठी सर्वच सदस्यांना उपस्थित राहून मतदान करण्याचा व्हीप भाजपकडून बजावण्यात आल्याची माहिती आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.