TET Exam Scam : TET परीक्षेची 650 बोगस प्रमाणपत्र जप्त; पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई

एमपीसी न्यूज – टीईटी गैरव्यवहार प्रकरणात दररोज नवनवीन माहिती उजेडात येत आहे. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणात आता बनावट प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये तब्बल 650 बोगस प्रमाणपत्र पोलिसांनी जप्त केली आहेत. राज्य परीक्षा परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी इतर आरोपींसोबत संगनमत करून निकाल लागल्यानंतर बनावट प्रमाणपत्र देऊन अनेकांना पास केल्याचं उघडकीस आले आहे. पुणे सायबर पोलिसांनी आतापर्यंत 2018 च्या परीक्षेतील 250 आणि 2019-20 चा परीक्षेतील 400 अशी 650 बनावट प्रमाणपत्र जप्त केली आहेत.

बोगस प्रमाणपत्राबाबत पुणे सायबर पोलिसांकडे 45 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. आतापर्यंतच्या तपासात तुकाराम सुपे आणि आरोपींनी 203 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचा पुरावा सापडला आहे. आरोपी तुकाराम सुपे अभिषेक सावरीकर आणि इतर एजंटांकडून 81 बनावट प्रमाणपत्र आतापर्यंत जप्त करण्यात आली आहेत. टीईटी परीक्षेमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एजंटांना हाताशी धरून अनेक अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आले होते, यासाठी त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.