_MPC_DIR_MPU_III

Pimpri : पिंपरीतील बेपत्ता चिटफंड व्यवसायिकाचा खून; महाडमध्ये आढळला मृतदेह

Murder of chit fund businessman from Pimpri; body found in Mahad.

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील चिटफंड व्यवसायिकाचा रायगड मधील महाड येथे शनिवारी (दि. 6) मृतदेह आढळला. गुरुवारी (दि. 4) ते व्यावसायिक पिंपरीतून बेपत्ता झाले होते. दरम्यान व्यावसायिकाच्या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. पिंपरी पोलिसांचा तपास सुरू असतानाच त्यांचा मृतदेह आढळला.

_MPC_DIR_MPU_IV

आनंद साहेबराव उनावणे (वय 45, रा. नर्मदा बिल्डींग, म्हाडा कॉलनी, मोरवाडी, पिंपरी) असे खून झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ विष्णू उनावणे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दिली आहे.

पोलीस उपायुक्‍त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीटफंडचा व्यवसाय असलेला भाऊ बेपत्ता असल्याची माहिती मयत आनंद यांच्या भावाने पोलिसांना दिली. त्यानुसार बेपत्ता असल्याची पोलिसांनी फिर्याद घेतली.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी मयत आनंद यांच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स काढले आणि तपासाला सुरुवात केली. मात्र पोलिसांचा शोध सुरू असतानाच आनंद उनावणे यांचा मृतदेह महाड येथे पाण्यात आढळून आला.

महाड पोलिसांनी पाठविलेले फोटो आणि फिर्यादी विष्णू यांनी पोलिसांना दिलेले फोटो यात साम्य वाटल्याने पिंपरी पोलीस आणि आनंद यांच्या नातेवाइकांना महाड येथे नेण्यात आले. नातेवाईकांनी मृतदेह आनंद यांचाच असल्याचे सांगितले.

बेपत्ताची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने तपास केला. आजही त्यांचा मोबाइल वेगळेच लोकेशन दाखवत आहे. तर मृतदेह वेगळ्या ठिकाणी मिळून आला असल्याचेही उपायुक्त मंचक इप्पर यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.