Dapodi Crime News : दगड, सिमेंटच्या ब्लॉकने ठेचून एकाचा खून, आरोपीला अटक 

एमपीसी न्यूज – अज्ञात कारणावरुन एकाचा दगड, सिमेंटचा ब्लॉक व फरशीने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. नरवीर तानाजी पुतळ्या जवळ, दापोडी याठिकाणी मंगळवारी (दि.1) दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. 

अनिल चिंतामण शिंदे (वय 48, रा. लिंबोरे वस्ती, दापोडी) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तर, यश महादेव गोपी (वय 21, रा. लिंबोरे वस्ती, दापोडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी खून झालेल्या इसमाचा भाऊ संतोष चिंतामण शिंदे (वय 41, रा. सिद्धार्थ नगर, बोपोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यश गोपी याने अनिल शिंदे यांचा अज्ञात कारणावरुन डोक्यात दगड, सिमेंटचा ब्लॉक व फरशी जोरात मारुन खून केला आहे. आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवारी करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.