Talegaon Dabhade : ‘चिमणी संवर्धन’ प्रकल्पाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज : रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या वतीने 26 जानेवारी निमित्त सकाळी 9:30 वाजता रोटरीचे अध्यक्ष रो. संतोष शेळके यांच्या हस्ते सेवाधाम ग्रंथालय येथे ध्वजारोहण करण्यात आले.

26 जानेवारी निमित्त ‘चिमणी संवर्धन’  या प्रकल्पाचे साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर आणि वडगाव मावळचे वनपरिक्षक सोमनाथ ताकवले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी रोटरीचे अध्यक्ष यांनी चिमणी संवर्धनसाठी घरटी तयार करण्यात आलेली आहेत ती घरटी 5000 ठिकाणी लावण्याचा मानस व्यक्त केला आहे.

दिवसेंदिवस चिमणी या पक्षांची संख्या कमी होत आहे. त्या दृष्टीने हा उपक्रम राबवत असून आता 1000 घरटी तयारी करून वाटप केली आहे. अशी माहिती त्यांनी पुढे बोलतात दिली. या प्रकल्पाचे  अविनाश नांगरे काम पाहत आहेत. याप्रसंगी पिंपरी टाऊन रोटरी क्लबचे अध्यक्ष सारंग मातडे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक अध्यक्ष रो. विलास काळोखे, रो. दिलीप पारेख, रो. संजय मेहता, रो. सुरेश शेंडे, रो. दादासाहेब उ-हे, रो.राजेश गाडे पाटील, रो.नितीन शहा, रो. मनोज ढमाले, रो.शाईन शेख, शरयू देवळे, रो. संजय चव्हाण, रो. राजू कडलक, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. रेश्मा फडतरे यांनी केले तर आभार प्रदर्शन रो. दीपक फल्ले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.