Akurdi : नालेसफाईकडे लक्ष्य वेधण्यासाठी उद्या राष्ट्रवादीचे नाल्यात बसून लाक्षणिक उपोषण

एमपीसी न्यूज – आकुर्डीतील नालेसफाईकडे महापालिका प्रशासन (Akurdi) दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे इखलास सय्यद आरोग्य विभागाच्या विरोधात उद्या (बुधवारी) नाल्यात बसून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

Nigdi News: ‘गणेश तलाव वाचवा, प्राधिकरणाचे सौंदर्य टिकवा’; प्राधिकरणातील नागरिकांचे लाक्षणिक उपोषण

आकुर्डी भागातून दोन मोठे नाले वाहत असतात. गेल्या अनेक महिन्यापासून नाले सफाई  वेळेवर होत नाही.  नाल्याच्या आसपास  राहणाऱ्या नागरिकांना नेहमीच दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत  आहे. ठिकठिकाणी नाले मोठ्या प्रमाणात तुंबले असून मच्छर फार वाढले आहेत.  आरोग्य विभागास वारंवार सूचना देऊन देखील आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठिकठिकाणी ड्रेनेज लाईन नाल्यातून वाहत असून नागरिक कमालीचे त्रस्त झाले असल्याने प्रशासन आणि आरोग्य विभागाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (Akurdi) आकुर्डी येथील सुर्वे गिरणीजवळून वाहणाऱ्या नाल्यात बसून  एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची महिती पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी दिली .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.