New Delhi : टोलवसुली 20 एप्रिल पासून पुन्हा सुरु होणार

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमध्ये काही काळासाठी बंद झालेली टोलवसुली आता पुन्हा सुरु होण्याचे संकेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दिले आहेत. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर 25 मार्चपासून पासून अनिश्चित काळासाठी टोलवसुली बंद करण्यात आली होती. दरम्यान, ही टोल वसुली 20 एप्रिल पासून पुन्हा सुरु करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानुसार 20 एप्रिलपासून लाॅकडॉऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करून उद्योगधंदे, शेती विषयक उद्योग व इतर कामांना मुभा दिली जाणार आहे. ग्रीन झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांना सुद्धा लाॅकडॉऊन मधून काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.

लॉकडाऊनमध्ये महामार्गावरील टोलवसुली अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आदेश काढत ही टोल वसुली 20 एप्रिलपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

टोल बूथ वरती टोलवसुलीसाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझर तसेच इतर संरक्षणात्मक बाबींची काळजी घेऊन, ही टोल वसुली सुरू करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.