Maval: धरण क्षेत्रात आज दिवसभरात 135 मिमी पाऊस; 60.74 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरण क्षेत्रात पाऊस परतला असून दमदार पाऊस पडत आहे. पाणलोट क्षेत्रात गेल्या आज दिवसभरात 135 मिमी पाऊस झाला असून रात्री नऊवाजेपर्यंत धरणात 60.74 टक्के पाणीसाठा झाला आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. परंतु, त्यानंतर दहा दिवस पावसाने दडी मारली. दोन दिवसापासून धरण क्षेत्रात पाऊस परतला आहे. जोरदार पाऊस पडत असून धरणातील पाणीसाठा 50 टक्क्यांहून अधिक झाला आहे.

आजमितीला धरणात 60.74 टक्के पाणीसाठा

शनिवार, 27 जुलै 2019 रोजी रात्री नऊ वाजेपर्यंतची माहिती

✅ आज दिवसभरातील पाऊस 135 मि.मि.

✅ 1 जूनपासून झालेला पाऊस 1511 मि.मि.

✅ धरणातील आत्ताचा पाणीसाठा 60.74 टक्के

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.