Nigdi : किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला; अज्ञात व्यक्‍तीविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – धक्‍का लागल्याच्या कारणावरून एकाने तरुणावर तरुणावर कोयत्याने हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी साडेचारच्या सुमारास निगडी येथे घडली.

सागर अनिल कांबळे (वय 21, रा. श्रमिकनगर, ओटास्कीम, निगडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्‍तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी फिर्यादी सागर हे स्पाईन रोड, निगडी येथील पीएमपीएमएल बस थांबा येथील स्वच्छतागृहाजवळ उभे होते. त्यावेळी तिथे आलेल्या अनोळखी व्यक्‍तीने कांबळे यांना धक्‍का मारला. यामुळे कांबळे यांनी धक्‍का का मारला?, अशी विचारणा केली.

चिडलेल्या आरोपीने शिवीगाळ करीत सागर यांच्या डोक्‍यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.