Nigdi : पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून तरुणाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कोयत्याने वार करून जखमी केले. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या मित्रालाही मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि. 5) दुपारी दुपारी दोनच्या सुमारास चिंचवड येथील अजंठानगरमधील भोपळे चौक येथे घडला.

आनंद ज्ञानदेव तिरकर (वय 22, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश सोनवणे (वय 22), विनायक टेकाळे (वय 20), अजिनाथ गायकवाड (वय 23), आकाश बनसोडे (वय 21), स्वप्नील गायकवाड (वय 24), आदेश गायकवाड (वय 23, सर्व रा. अजंठानगर, चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तिरकर यांची आई यांना सांगवी येथे जायचे होते. त्यांच्यासाठी रिक्षा आणण्यासाठी फिर्यादी तिरकर व त्यांचा मित्र सोमनाथ हे दोघे भोपळे चौकात थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. ‘तू आमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार का दिली’, असे म्हणून त्यांनी शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी कोयता हातावर मारून फिर्यादी यांना जखमी केले. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांचा मित्र सोमनाथ यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.