Nigdi : पाण्याच्या कॅनसह पिकअप चोरले

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेले पाण्याच्या कॅनने भरलेले पिकअप चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 25) सकाळी साडेसातच्या सुमारास आकुर्डी येथे उघडकीस आली.

मयुर बबन कुंभार (वय 28, रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास कुंभार यांनी आपली पिकअप जीप (एम एच 11 / ए जी 6793) दत्तवाडी, आकुर्डी येथील सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली. पिकअपमध्ये मॉन्ट ऍक्वा कंपनीचे 120 पाण्याचे कॅन भरलेले होते.

बुधवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्यांना आपली चार लाख 15 हजार रुपये किंमतीची जीप चोरीस गेल्याचे समोर आले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.