No Parking : दिघी-आळंदी वाहतूक विभागांतर्गत ‘नो पार्किंग’

एमपीसी न्यूज – दिघी-आळंदी वाहतूक विभागाच्या हद्दीत तात्पुरत्या स्वरूपात काही ठिकाणी ‘नो पार्किंग’ करण्यात आले आहे. याबाबत पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी आदेश दिले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी यापूर्वीचे निर्बंध रद्द करून दिघी-आळंदी विभागांतर्गत नो पार्कींगचे तात्पुरत्या स्वरुपातील आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ममता स्वीट्स ते दत्तनगरकडे, दिघी गावठाणकडे, दिघी रोडकडे व फुगेवाडी बसस्टॉपकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग असणार आहे.

घुंडरे आळी चौकापासून चाकण चौकाकडे, वडगाव चौकाकडे, केळगाव चौकाकडे, माऊली मंदिराकडे अशा घुंडरे आळी चौकाच्या चारही बाजूच्या रस्त्यावर 50 मीटर नो पार्कींग असेल. साईमंदिर कमान समोरील सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) ते मॅगझीन चौकाकडे व आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर 100 मीटर नो पार्कींग असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.