Nigdi Crime News : शस्त्र बाळगल्याबाबत एकास अटक

एमपीसी न्यूज – निगडी पोलिसांनी एकास शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून एक लोखंडी सत्तूर जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 11) सायंकाळी साडेसहा वाजता अजंठानगर, चिंचवड येथे केली.

बाबासाहेब उर्फ भय्या हनुमंत गजरमल (वय 31, रा. अजंठानगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई उद्धव खेडकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबासाहेब याने शर्टच्या पाठीमागे पॅन्टमध्ये बेकायदेशीररित्या एक लोखंडी सत्तूर दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत बाबासाहेब याला अटक केली. त्याच्याकडून सत्तूर जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.