Ravet Crime News : रावेत येथील बेकायदेशीर आरागिरणीवर वनविभागाची कारवाई, मशीनसह लाकडाचा अवैध साठा जप्त

एमपीसी न्यूज – भांबुर्डा वनपरिक्षेत्र परिसरात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या आरागिरणीवर छापा टाकून एक आरा मशीन, 2 कटर यंत्रे जप्त करण्यात आली. आरा गिरणीसाठी लाकडाचा अवैध साठा आढळून आलेले हे गोडाऊन सीलबंद करण्याची कारवाई आज पुणे वनविभागाने केली आहे.

वनविभागाला रावेत (पिंपरी चिंचवड) येथे बेकायदेशीर आरागिरणी (सॉ मिल) सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरुन ही कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या आरागिरणीमध्ये प्रितम गौतमचंद कांकरिया यांच्या मालकीच्या रावेत येथील समर्थ पॅकेजिंग या आरागिरणीचा समावेश होता.

पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील (भा.व.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक मयूर बोठे, भांबुर्डा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान, वनपाल वैभव बाबर, महेश मेरगेवाड, वनरक्षक सुरेश बरले, बाळासाहेब जिवडे, ज्ञानेश्वर ठाकरे आणि भांबुर्डा वनपरिक्षेत्रातील इतर वनकर्मचाऱ्यांनी या छाप्यामध्ये सहभाग घेतला.

या प्रकरणात भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये वनगुन्हा नोंदवून पुढील तपास चालू आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.