Pimpri News : चहाच्या टपरीवर महिलेचा विनयभंग, टपरीतील साहित्याचीही केली तोडफोड

एमपीसी न्यूज – चहा आणि वडापावच्या टपरीवर महिलेचा विनयभंग केला, तसेच टपरीवरील साहित्याचेही तोडफोड केली. जुन्या भांडणाच्या रागातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सोनवणे अमृततुल्य, मौजे दिघी, ता. हवेली येथे शनिवारी (दि.02) सायंकाळी 5.30 वा. ही घटना घडली.

पिडीत महिलेने याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अक्षय बाळासाहेब बंधाटे (रा. फुगेवस्ती, भोसरी) याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 354, 427, 504, 506 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ह्या त्यांच्या सोनवणे अमृततुल्य या टपरीवर थांबलेल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी यांचा मित्र अक्षय सोनवणे याच्या ओळखीचा आरोपी अक्षय बंधाटे टपरीवर आला. अक्षय सोनवणे याचे वडील आणि आरोपी अक्षय बंधाटे याचा भाऊ यांच्यात भांडण झाले होते. या भांडणाच्या रागातून आरोपीने काठीने टपरीतील साहित्याची तोडफोड केली. फिर्यादी यांनी आरोपीला अडविले असता, फिर्यादीच्या अंगावरील कपडे फाडून त्यांचा विनयभंग केला. असे फिर्यादीत नमूद केले आहे. दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.