Chikhali News : गांजा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीकडून सुमारे अर्धा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 30) दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास पवारवस्ती चिखली येथे करण्यात आली.

अमित रामानंद चौधरी (वय 35, रा. पवारवस्ती, चिखली)  असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस नाईक मनोज राठोड यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित चौधरी याने त्याच्याकडे बेकायदेशीरपणे विक्रीसाठी गांजा बाळगल्या असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी पवारवस्ती चिखली येथे कारवाई केली. त्यात पोलिसांनी आरोपी अमित चौधरी याच्याकडून 467 ग्रॅम वजनाचा 11 हजार 675 रुपये किमतीचा गांजा, तसेच दोन हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल फोन असा एकूण 23 हजार 675 रुपयांचा ऐवज जप्त केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.