Ravet News : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीला सोशल मीडिया वरून मेसेज करून तसेच प्रत्यक्षात तिची वाट अडवून तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवार (दि. 28) सायंकाळी साडेसहा ते बुधवार (दि. 30) सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत प्राधिकरण निगडी येथे घडली.

प्रसन्न प्रदीप साळुंखे (वय 29, रा. किवळे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या 14 वर्षीय मुलीला मागील दोन महिन्यांपासून सोशल मीडिया वरून मेसेज केले. तसेच सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीचा आरोपीने हात पकडला. तर बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पीडित मुलीला आरोपीने आवाज देऊन थांबवले. त्यानंतर पीडित मुलीला तिचा मोबाईल नंबर मागून तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.