Talegaon Dabhade News : अक्षय तृतीयानिमित्त ग्रामदैवत डोळसनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणा-या अक्षय तृतीया निमित्त तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात श्री डोळसनाथ महाराज ट्रस्ट व लोकसहभागातून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी (दि.3 मे) सकाळी सात पासून रात्री साडेसात वाजेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. अक्षय तृतीया हा दिवस विविध प्रकारचे दान करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे –
सकाळी 7.00 वाजता- श्रींची महापुजा व अभिषेक, सकाळी 10.00 वाजता- श्रींची महापुजा, सकाळी 11.00 वाजता – रुद्र याग होमहवन, दुपारी 4.00ते 5.00 वाजता – हरिपाठ (श्री डोळसनाथ महिला भजनी मंडळ),
सायं. 5.00 ते 6.00 वाजता- भजन (श्री डोळसनाथ भजनी मंडळ), सायं. 6.00 वाजता- काळभैरवाअष्टक पठण व दीपमाळ प्रज्वलन, सायं. 6.05 ते 7.15 वाजता – प्रवचन (श्री ह.भ.प. रामायणाचार्य उध्दव महाराज अटाळीकर विदर्भ), रात्री 7.30 वाजता- श्रींची आरती व महाप्रसाद होणार आहे. तरी सर्व नागरिक व बंधू-भगिनी आणि भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन डोळसनाथ महाराज ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्या भाविक-भक्तांना भंडाऱ्यासाठी देणगी द्यावयाची असेल त्यांनी खालील व्यक्तिंशी संपर्क साधावा.

  • राजेश पिराजी सरोदे-9850872757
  • यतिन सुरेशभाई शहा- 9822027575
  • अजय तुकाराम भेगडे-9762978080
  • हेमंत शामराव दाभाडे -9822595380

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.