Pune news: अण्णासाहेब मगर रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार

एमपीसी  न्यूज: हडपसर येथील अण्णासाहेब मगर रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यासाठी इन्फोसिस कंपनीने पाचशे एलपीएम क्षमतेचा ऑक्सिजन जनरेटिंग प्लॅन्ट सीएसआर निधीतून उपलब्ध करून दिला आहे. यासाठी आवश्यक असणारे साहित्य कंपनीने परदेशातून आयात केले आहे.

हा प्लॅन्ट कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणारी कामे पूर्ण करण्यासाठी एकोणीस लाख एक्केचाळीस हजार १७७ रुपयांचा खर्च करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

याठिकाणी १३ टन क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणे, व्हेपोरायझर बसविणे, प्रेशर रेग्युलेटरी सिस्टिम बसविणे, व्हॉल्‌व्ह बसविणे अशी कामे केली जाणार आहेत. आमदार चेतन तुपे यांनी या कामासाठी सेहेचाळीस लाख रुपयांचा स्थानिक विकास कार्यक्रम निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी त्रेचाळीस लाख रुपये खर्च करण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.