PCMC : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चेत’ महापालिका विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक  यांच्यासोबत थेट प्रक्षेपणाद्वारे आज संवाद साधला. (PCMC) पिंपरी-चिंचवड शहरातील खाजगी आणि महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी देखील या कार्यक्रमात थेट प्रक्षेपणाद्वारे सहभागी झाले होते.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा  “परीक्षा पे चर्चा” हा कार्यक्रम नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडीयम या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमामध्ये देश-विदेशातील विद्यार्थी, शिक्षक व पालक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे दूरदर्शन तसेच विविध खाजगी माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.

Pimpri : अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या हस्ते कुशल्स फॅशन ज्वेलरीच्या महाराष्ट्रातील पहिल्या स्टोअरचे उद्घाटन

शालेय शिक्षण व साक्षरता  विभागाच्या निर्देशानुसार शहरातील इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या वर्गांमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम पाहता यावा यादृष्टीने शहरातील शाळांच्या सभागृहामध्ये मोठ्या स्क्रिनवर प्रत्यक्ष प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. (PCMC) या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेविषयी असणाऱ्या विविध शंकांचे उदाहरणासह निरसन केले.

तणावमुक्त राहून अभ्यास करावा, वेळेचे योग्य नियोजन करून अभ्यास करावा  तसेच स्वतःमधील सामर्थ्य ओळखून त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते अशा प्रकारच्या टिप्स त्यांनी या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या. या कार्यक्रमामुळे परीक्षेविषयी असणाऱ्या मनातील विविध शंकांचे निरसन झाल्याचे तसेच परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास अधिक दृढ झाला असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.