Partition Remember : महापालिकेतर्फे फाळणीबाबतच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विभाजन विभिषिका स्मरण दिन (Horrors of partition rememberance day) 14 ऑगस्टच्या अनुषंगाने फाळणीबाबतच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे  प्रेक्षागृह येथील पहिल्या मजल्यावरील आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन आयोजित केले आहे. फाळणीच्या (Partition Remember) प्रसंगांमध्ये झालेल्या महासंहारमध्ये बळी पडलेल्या भारतीय नागरिकांच्या हालअपेष्टा छायाचित्रात स्पष्ट दिसतात.  माहितीसह छायाचित्र असे 52 फोटोग्राफ या प्रदर्शनात मांडले आहेत. 3 फूट बाय दोन फूट अकरातील या  प्रिंटवर तत्कालीन वृत्तपत्रांमधील कात्रणे व फोटो यांचे कोलाज पहाता येईल. या घटनेचा 14 ऑगस्ट या स्मृतीनिमित्त हे आयोजन केले आहे.

Pavana Dam: धरणातून 2121 क्युसेकने पाण्याचा विसर्ग

प्रदर्शनाला (Partition Remember) प्रवेश विनामूल्य आहे. शहरातील नागरिकांनी, शालेय मुलांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.