Rathnai: रहाटणीतील ग्रेडसेपरेटरच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी

PCMC commissioner shravan hardikar inspected the work of the grade separator in rahatani

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावर साई चौक (जगताप डेअरी) रहाटणीतील दोन समांतर ग्रेडसेपरेटरचे काम तत्काळ सुरु करावे. पावसाळ्यापूर्वी ग्रेडसेपरेटर नागरिकांकरिता वाहतुकीसाठी सुरु करावा, अशा सूचना करत लॉकडाउनमध्ये काम सुरु करण्यास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी परवानगी दिली आहे.

लॉकडाउनमुळे ग्रेडसेपरेटरचे काम बंद होते. निर्बंध शिथिल केल्याने आणि अत्यावश्यक कामे सुरु करण्यास परवानगी दिली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पुलाची पाहणी केली.

बीआरटीएसचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, उपअभियंता संजय काशीद, उपअभियंता, प्रवक्ते विजय भोजने, कनिष्ठ अभियंता अनिरुद्ध दाढे उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावर साई चौक (जगताप डेअरी) रहाटणीतील दोन समांतर ग्रेडसेपरेटरचे काम हाती घेतले होते. बऱ्यापैकी काम पूर्ण झाले होते. परंतु, लॉकडाउनमुळे ते बंद होते.

आता कामाला सुरुवात करण्यास परवानगी दिली आहे. ग्रेडसेपरेटरच्या भिंतीना टाईल बसविण्याचे काम चालू आहे. उपलब्ध कामगारांकडून दोन पाळ्यांमध्ये काम पुर्ण केले जाईल. तशा सूचना ठेकेराला दिल्याचे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

हा ग्रेडसेपरेटर सुरु झाल्यास जगताप डेअरी चौक येथील वाहतूक कोंडी कमी होऊन चौक सिग्नल फ्री होणार आहे. हिंजवडी आयटी पार्ककडे जलद गतीने जाण्यास मदत होणार असल्याचे, प्रवक्ते विजय भोजने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.