PCMC : मालमत्ता कराचा भरणा करा अन्यथा पाण्याचे नळजोड तोडणारच – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (PCMC) मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला पाहिजे. थकीत मालमत्ता धारकांचे नळजोड तोडण्याची कायद्यात तुरतूद आहे. त्यामुळे जे मालमत्ताधारक कर भरणार नाहीत. त्यांचे नळजोड तोडण्यात येत आहेत. कराचा भरणा न केल्यास नळजोड तोडले जातील. नळजोड तोडण्याची कारवाईची नियमाच्या बाहेर जावून केली जात नसल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

एखाद्या गृहनिर्माण सोसायटीतील काही लोकांनी कर भरला असेल. तर, संपूर्ण सोसायटीचे नळजोड न तोडता फक्त कर न भरणाऱ्यांचे पाणी कसे तोडता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत आयुक्त सिंह म्हणाले, शहरात 5 लाख 90 हजार निवासी व बिगरनिवासी मालमत्तांची नोंद महापालिकेकडे आहे. आतापर्यंत 565 कोटी रुपये मालमत्ताकराचा भरणा झाला आहे. 1 लाख 62 हजार निवासी मालमत्ता धारकांकडून अनधिकृत बांधकाम शास्तीकर वगळून मूळ मालमत्ताकरांची 480 कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल करण्यासाठी पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने जप्ती मोहीमेसह, नळजोड तोडण्याचीही कार्यवाही करण्यात येत आहे.

Bhosari Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर जबरदस्ती केली

काही थकबाकीदारांसाठी संपूर्ण सोसायटीचे (PCMC) नळजोड तोडणे योग्य आहे का? याबाबत आयुक्त सिंह यांना विचारले असता ते म्हणाले, मालमत्ता कर न भरणाऱ्यांचे नळजोड तोडण्याची कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे पिंपरी पालिका वेगळे असे काही करत नाही. एखाद्या सोसायटीतील काही लोकांनी कर भरला असेल. तर, संपूर्ण सोसायटीचे नळजोड न तोडता फक्त कर न भरणाऱ्यांचे पाणी कसे तोडता येईल, यासाठी संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मात्र, वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.