Remdesivir Shortage : देशात औषध कंपन्यांनी Remdesivir इंजेक्शनचे उत्पादन वाढवले

एमपीसी न्यूज : देशात कोरोनाबाधित (Corona in India) रुग्णांचा वाढता आकडा थक्क करणारा असतानाच कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या रेमडेसिविर औषधाचा (Remdesivir Injection) गेल्या काही दिवसांपासून तुटवडा जाणवत होता. रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक ठिकाणी फिरूनही हे औषध मिळत नव्हते. मात्र, आता औषध कंपन्यांनी याचे उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या रविवारी भारत सरकारने या औषधाचा देशात तुटवडा असल्याने त्याच्या निर्यातीवरही बंदी घातली होती. या औषधच्या तुटवड्याविरोधात आज पुण्यातही आंदोलन सुरू आहे. रेमडिसिव्हीरबाबत अशी परिस्थिती असताना एक दिलासादायक बातमी समोर येते आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिव्हीर औषधाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे, याचा विचार करून नवीन तीन ते चार प्लांटमध्ये औषधाचे उत्पादन सुरू आहे. वाढती मागणी लक्षात घेता पाच ते सहा लाख असणारे उत्पादन आता महिन्याला दहा ते बारा लाख डोसेसपर्यंत वाढवण्यात आले आहे.

याहून अधिक म्हणजे वीस लाख प्रति महिना हे आमचे पुढील उत्पादन लक्ष्य असणार आहे. त्यामुळे काही दिवसातच या औषधाचा पुरवठा सुरळीत होईल, असे ‘जायडस कॅडीला’च्या (Zydus Cadila) प्रवक्त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.