Pimpri: दहा दिवसांत 46,266 संशयित दाखल, त्यापैकी तब्बल 36,531 जण निगेटिव्ह

Pimpri: 36,531 out of 46,266 suspects registered in ten days are negative नागरिक स्वत:हून पुढे येत आहेत. स्वॅबची तपासणी करत आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने नागरिकांमध्ये जागृतीचे प्रमाणही वाढले आहे. थोडीसी लक्षणे दिसू लागताच, पॉझिटिव्ह रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील नागरिक स्वत:हून संशयित म्हणून रुग्णालयात दाखल होत आहेत. मागील दहा दिवसांत 46,266 संशयित रुग्णालयात दाखल झाले होते. त्यापैकी तब्बल 36,531 जण निगेटिव्ह आले आहेत. त्याचे प्रमाण 78.65 टक्के आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. तर, 9692 जण पॉझिटिव्ह आले असून त्याचे प्रमाण 20.95 टक्के आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. राज्यातील कोरोनाचे रुग्ण वाढणा-या शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश होत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये जागरुकता वाढली आहे.

संशयितांचे प्रमाण वाढत आहे. पालिकेकडून रुग्ण शोधण्याला प्राधान्य दिले जात आहे. रुग्ण शोधून त्यांच्या तपासण्या वाढविल्या आहेत. दिवसाला तीन हजारहून अधिक जणांच्या चाचण्या केल्या जात आहेत.

नागरिक स्वत:हून पुढे येत आहेत. स्वॅबची तपासणी करत आहे. जुलै महिन्याच्या 20 ते 30 जुलै या दहा दिवसांत तब्बल 46 हजार 266 रुग्ण संशयित म्हणून रुग्णालयात दाखल झाले होते. त्या सर्वांची चाचणी करण्यात आली.

त्यातील तब्बल 36 हजार 531 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याचे प्रमाण 78.95 टक्के आहे. तर, 9692 जण पॉझिटीव्ह आले आहेत. दहा दिवसातील पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण 20.95 टक्के आहे.

या आकडेवारीवरुन बाधित रुग्णांच्या प्रमाणापेक्षा निगेटिव्ह रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिक स्वत:हून पुढे येत असल्याने आणि निगेटिव्ह येणा-यांचे प्रमाण जास्त आहे, ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

20 ते 30 जुलै दरम्यान दाखल झालेले संशयित रुग्ण, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आलेले रुग्ण

20 जुलै रोजी 2917 कोरोना संशयित दाखल झाले होते. त्यातील 680 जण पॉझिटिव्ह तर 2161 जण निगेटिव्ह आले. 21 जुलै रोजी 2761 दाखल झाले होते. त्यापैकी 536 जण पॉझिटिव्ह तर 1508 जण निगेटिव्ह आले होते.

22 जुलै रोजी दाखल झालेल्या 4437 संशयितापैकी 927 पॉझिटिव्ह तर 3187 जण निगेटिव्ह आले. 23 जुलै रोजी 3389 दाखल झाले होते. त्यापैकी 716 पॉझिटिव्ह तर 2857 निगेटिव्ह आले.

24 जुलै रोजी 3973 संशयित दाखल झाले. यापैकी 843 पॉझिटिव्ह तर 2521 निगेटिव्ह, 25 रोजी दाखल झालेल्या 5217 पैकी 1079 पॉझिटिव्ह तर 5282 निगेटिव्ह आले होते.

26 जुलै रोजी 3387 संशयित दाखल झाले होते. त्यातील 683 पॉझिटिव्ह तर 2995 निगेटिव्ह आले. 27 रोजी 4909 दाखल झाले. त्यातील 1024 पॉझिटिव्ह तर 4411 निगेटिव्ह आले. 28 रोजी 5667 दाखल झालेल्यांपैकी 1181 पॉझिटिव्ह तर 3986 निगेटिव्ह आले.

29 रोजी 5172 संशयितांपैकी 1077 पॉझिटिव्ह तर 3999 जण निगेटिव्ह आले होते. 30 जुलै रोजी 4437 संशयितांपैकी 919 पॉझिटिव्ह तर 3624 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.