Pimpri : भाटनगर मधील दारूभट्टीवर खंडणी विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाटनगर येथे (Pimpri) सुरु असलेल्या दारूभट्टीवर खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली. त्यात पोलिसांनी 65 हजारांचा ऐवज नष्ट केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 21) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

ओमकार संजय पालकर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस( Pimpri) अंमलदार निशांत काळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chikhali : कृष्णानगर पोलीस वसाहतीत भर दिवसा घरफोडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस पिंपरी परिसरात गस्त घालत असताना निशांत काळे यांना माहिती मिळाली की, भाटनगर येथील रूम नंबर 61 मध्ये गावठी दारू तयार करण्याची भट्टी लावली आहे. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली असता दारू भट्टी लावल्याचे आढळले.

पोलिसांनी अल्कोहोल, रसायने आणि इतर वासू असा एकूण 65 हजार पेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल नष्ट केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.