Pimpri : स्थायी समितीची 92 कोटींच्या विकासकामांना मंजुरी; ऐनवेळी चार विषय मांडले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामे करण्यासाठी सुमारे 92 कोटी 53 लाख 84 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेत शुक्रवारी (दि. 27) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते.

स्थायी समितीच्या सभेत एकूण 68 कामांना मंजुरी देण्यात आली. सभेत ऐनवेळी चार विषय मांडण्यात आले. त्यासाठी एकूण 85 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांच्या विमा योजनेसाठी 27 कोटी 84 लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक 20 येथील एमआयडीसी परिसरातील रस्ते विकसित करण्याच्या कामासाठी 5 कोटी 4 लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

  • काही महत्वाची कामे आणि देण्यात आलेली आर्थिक मंजुरी –
    # विद्युत विभागासाठी आवश्यक असलेले खांब खरेदीकामी 51 लाख रुपये
    # नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत बाळाचे प्रसुतीपुर्व अपंगत्व ओळखण्यासाठी गर्भवती महिलांची व प्रसुतीपश्चात नवजात बालकांची तपासणी करण्यासाठी 71 लाख रुपये
    # कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्रमांक चार दिघी येथील गणेशनगर परिसरातील मलनि:सारण नलिकेची सुधारणा करण्यासाठी 31 लाख रुपये
    # प्रभाग क्रमांक 24 मधील पवारनगर चौक ते थेरगाव फाटा या रस्त्यावर सुशोभिकरणाची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी येणाऱ्या 4 कोटी 71 लाख रुपये
    # कासारवाडी मधील विविध रस्ते विकसित करण्यासाठी 2 कोटी 82 लाख रुपये
    # विद्युत विभागाच्या विविध कामांसाठी 1 कोटी 27 लाख रुपये
    # निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या विविध युनिट्ससाठी उपलब्ध असलेले वाल्व्ह व इतर कामे करण्यासाठी 75 लाख रुपये
    # उद्यमनगर येथील उद्यानात विरंगुळा केंद्र बांधणे आणि इतर कामांसाठी 52 लाख रुपये
    # बर्ड व्हॅली उद्यानात स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 64 लाख रुपये
    # प्रभाग क्रमांक 15 मध्ये महात्मा बसवेश्वर पुतळा उभारणे आणि इतर कामांसाठी 62 लाख रुपये
    # काळेवाडी कोकणेनगर येथील मज्जीद रोड व पवना चौक ते तपकीर मळा चौक, अभियंता कॉलनी संत ज्ञानेश्वर कॉलनी रस्त्यांचे डांबरीकरण-काँक्रीटकरण करण्यासाठी 80 लाख रुपये
    # रुपीनगर तळवडे पसिसरातील अस्तीत्वातील रस्ते विकसित करण्यासाठी 54 लाख रुपये
    # प्रभाग क्रमांक 11 मध्ये विविध ठिकाणी 24×7 अंतर्गत खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी 53 लाख रुपये
    # नेवाळेवस्ती, हरगुडेवस्ती, पवारवस्ती येथे रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी 89 लाख रुपये
    # ज्योतिबानगर परिसरातील अस्तित्वातील रस्ते विकसित करण्यासाठी 53 लाख रुपये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.