Pimpri Corona Update : रविवारी शहरात सहा नवीन रुग्ण; सहा जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 10) दिवसभरात सहा नवीन रुग्ण आढळले, तर 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोना बाधितांची आजवरची संख्या 3 लाख 59 हजार 319 एवढी झाली आहे. तर आजवर 3 लाख 55 हजार 355 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात 71 रुग्ण सक्रिय आहेत. या सर्व रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 147 लसीकरण केंद्रांवर 5 हजार 142 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 35 लाख 31 हजार 562 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.