Pimpri: कुटुंब सांभाळा! झोपडपट्टीमधील कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांना कोरोनाचा संसर्ग

Pimpri-chinchwad corona update: Corona infection in more than one family member in a slum आजपर्यंत शहरातील 1370 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 810 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूने अनेक कुटुंबाना पछाडले आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील अनेक कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता कोरोनाने झोपडपट्यांमध्ये कहर केला आहे. काही झोपडपट्यांमधील एकाच कुटुंबातील अधिक सदस्यांना कोरोनाची बाधा झाला आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाने संपूर्ण शहराला विळखा घातला आहे. शहराच्या सर्वच भागात आता कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दररोज नवीन भागात रुग्ण सापडत आहेत.

आजपर्यंत शहरातील 1370 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 810 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाने झोपडपट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे.

शहरातील चिखली, ताथवडे, च-होली, दापोडी, आनंदनगर, इंदिरानगर, रुपीनगर, भाटनगर, अजंठानगर, पिंपरीतील नाणेकर चाळ, बौद्धनगर, संभाजीनगर, कासारवाडी या भागातील कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील काही जण बरेही झाले आहेत.

दापोडी, अजंठानगर, आनंदनगर, इंदिरानगर झोपडपट्यांमधील एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. झोपडपट्यांमधील अनेकजण नोकरी, काम, व्यावसायासाठी बाहेर जातात.

अनेक महिला शहरातील विविध भागातील मोठ्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये घरकामासाठी जातात. या नागरिकांनीही अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

लक्षणे दिसल्यावर रुग्णालयात दाखल व्हावे. आपल्यापासून कुटुंबातील कोणाला संसर्ग होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे.

झोपडपट्यांमध्ये घरे छोटी आहेत. एका घरात अनेकजण राहतात. त्यामुळे एकापासून अनेकाला कोरोनाचा संसर्ग होताना दिसून येत आहे. तसेच शौचालयेही एकच असते. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

लक्षणे दिसताच तत्काळ रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे. जेणेकरुन आपल्यापासून कोणाला संसर्ग होणार नाही.

घर छोटे असेल तर ‘अशी’ घ्या काळजी!
झोपडपट्यांमध्ये घरे छोटी आहेत. तरीही, काळजी घेता येईल. घरातील सदस्याला विलगीकरण करायचे असेल. तर, घरामध्ये एक पडदा टाकावा.

विलगीकरण केलेल्या सदस्याला एका बाजूला ठेवावे. त्याची जेवणाची भांडी, कपडे स्वतंत्र ठेवावीत. घरातील प्रत्येक सदस्याने मास्कचा वापर करावा. अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त गर्दीत जाणे टाळावे.

एकच शौचालय असेल. तर, ते वारंवार स्वच्छ करावे. ही खबरदारी घेतल्यासही कोरोनाचा संसर्ग होण्यापासून आपण वाचू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.