Pimpri Corona Update : कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, शहरात आज नवीन 1 हजार रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहराच्या विविध भागातील 1 हजार नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 27 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे शहरातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 526 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 82 हजार 329 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 3 हजार 135 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 2 हजार 809 रुग्ण गृहविलगीकरणात असून 326 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 64 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 324 आहेत. आज दिवसभरात 22 हजार 143 नागरिकांचे लसीकरण झाले असून आजपर्यंत 30 लाख 40 हजार 822 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.