Mumbai News : सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण! विद्या चव्हाण यांना अमृता फडणवीस यांची नोटीस

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसा यांचा ‘डॉन्सिंग डॉल’ असा उल्लेख केला होता. यावर आक्षेप घेत अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानाची नोटीस पाठवली आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

अमृता फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण!’

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी पाठवलेली कोणतीही नोटिस मला मिळाली नाही, असे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.