Pimpri Chinchwad : शहरातील विकास कामांचा हरियाणाच्या विस्तारीकरणासाठी उपयोग होईल – दिपक सूरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pimpri Chinchwad) केलेला शहराचा विकास, उभारलेले भव्य प्रकल्प, प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल सोईसुविधा पाहता या विकास कामांचा निश्चितच आमच्या महापालिकेच्या विस्तारीकरणासाठी उपयोग करून घेता येईल, असे प्रतिपादन हरियाणा राज्यातील पंचकूला महापालिकेचे उप आयुक्त दिपक सूरा यांनी केले.

हरियाणा राज्यातील पंचकूला महापालिकेच्या (Pimpri Chinchwad) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि नगरसदस्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेस भेट दिली. त्यावेळी दिपक सूरा बोलत होते. महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी महापालिकेचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, उप आयुक्त अजय चारठाणकर आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

या दौ-यात पंचकूला महापालिकेचे उपायुक्त दीपक सुरा यांचे समवेत कार्यकारी अभियंता सुमित मलिक, मुख्य आरोग्य निरीक्षक अविनाश सिंगला, सहाय्यक अभियंता मनोज अहलुवालिया, कनिष्ट अभियंता सोमबीर त्याचबरोबर नगरसेवक सुरेश वर्मा, सोनीया सूद, जयकुमार कौशिक, उषा राणी, राजेश कुमार, औंमवती पूनिया,सुमित सिंगला, गौतम प्रसाद आणि अक्षय चौधरी यांचा समावेश आहे.

Pimpri : संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठीचे प्रबोधनकार ठाकरे यांचे योगदान कायम स्मरणात राहील – उल्हास जगताप

यावेळी बोलताना दीपक सूरा म्हणाले, पंचकूला नगरपालिकेचे 2013 मध्ये महापालिकेत रूपांतर झाले. शहराची लोकसंख्या सुमारे तीन लाख पन्नास हजाराच्या अधिक असल्याचे तर शहराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी 20 नगरसेवक आणि 3 स्वीकृत नगरसेवक कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिका हद्दीत पर्वत रांगा,दाट झाडी असे सुंदर वातावरण असून औद्योगिक क्षेत्र देखील आहे. तसेच ऐतिहासिक माता मनसा देवी मंदिर देखील आहे. या महापालिकेचे 150 कोटी पेक्षा जास्त बजेट आहे. या शहराचा झपाट्याने विस्तार होत असून त्याच्या विस्तारीकरणासाठी आदर्श महानगरपालिकांचा अभ्यास दौरा करीत आहोत.

महापालिकेच्या वतीने सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी पाणीपुरवठा व्यवस्थापन,संजय कुलकर्णी यांनी पर्यावरण,घनकचरा व्यवस्थापन तर उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी स्वच्छ भारत अभियान तसेच आरोग्य विषयक माहिती चलचित्राद्वारे दिली. यावेळी त्यांनी चिंचवड स्टेशन येथील महापालिकेच्या विज्ञान केंद्रास देखील भेट देऊन माहिती घेतली. जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.