Pimpri : संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठीचे प्रबोधनकार ठाकरे यांचे योगदान कायम स्मरणात राहील – उल्हास जगताप

एमपीसी न्यूज – केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे थोर समाजसुधारक, ख्यातनाम पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड (Pimpri) महापालिकेच्या वतीने केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास उपायुक्त सचिन ढोले, रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे आदी उपस्थित होते.

Dehugaon : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

अतिरिक्त आयुक्त (Pimpri) जगताप म्हणाले, “प्रबोधनकार ठाकरे हे लोकहितवादी नेते, ख्यातनाम लेखक व इतिहास संशोधक होते. तसेच त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रचार प्रसार केला. अनेक साहित्य संपदांची निर्मिती केली. अंधश्रद्धा, अन्याय्य रूढींना सतत विरोध केला. त्यासाठी त्यांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती या तीन मार्गाचा अवलंब केला असे सांगून संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.