Pimpri Chinchwad : मनपा कचरा नियमित उचलत नसल्याने हाऊसिंग सोसायटीतील नागरिक त्रस्त

एमपीसी न्यूज : वाकड व रहाटणी भागातील काही हाऊसिंग सोसायटींचा कचरा पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महानगरपालिकेचा आरोग्य विभाग नियमित उचलत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत बोलताना शोनेस्ट टॉवर्स हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन विवेक देवरणकर म्हणाले की, “आमच्या सोसायटीमध्ये 8 इमारतीत एकूण 300 फ्लॅट्स आहेत. मनपामार्फत आमचा कचरा सलग 2- 3 दिवस उचलला जात नसल्याने तो साठवून ठेवावा लागतो. सोसायटीकडे एवढा कचरा साठवायला बीन्स नसल्याने कधी ओला व सुका कचरा एकत्र झाला तर मनपा ठेकेदार कर्मचारी कचरा घ्यायला नकार देतात. 2- 3 दिवस कचरा साठल्यामुळे दुर्गंधी सुटते. दिवसा हाऊसकीपिंग स्टाफ असताना कचरा नेत नसल्याने कचरा सोसायटीबाहेर ठेवावा लागतो. भटकी कुत्री तो कचरा अस्तव्यस्त करून विखूरतात. त्यामुळे मनपाने आमचा कचरा दररोज दिवसा उचलून न्यावा, ज्यामुळे आम्हाला त्रास होणार नाही”, अशी मागणी देवरणकर यांनी केली आहे.

Alandi News : आळंदी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात विविध सेवाभावी संस्थेंचा सहभाग

गुलमोहर गार्डन हौसिंग सोसायटीतील मॅनेजिंग कमिटीचे सदस्य (Pimpri Chinchwad) काशिनाथ उगिले म्हणाले, की “आमची सोसायटी रहाटणीमधील काळेवाडी भागात आहे. ही सोसायटी 84 फ्लॅट्सची आहे. 18 व 19 डिसेंबर रोजी आमचा कचरा उचलला नव्हता. त्यामुळे मी पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडेरेशनचे चेअरमन दत्तात्रेय देशमुख, स्थानिक नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे याबाबत बोललो. तसेच, वरिष्ठ मनपा अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर कचरा आता उचलत आहेत. आमच्यासारख्या छोट्या सोसायटीकडे ओला कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करण्यासाठी जागा नाही. मनपाने ठेकेदार नेमावा आमच्यासारख्या सोसायटींचा कचरा घेऊन त्यापासून कंपोस्ट तयार करण्यासाठी मनपाने आमच्याकडून थोडा टॅक्स वाढवून घ्यावा.”

Pimpri Chinchwad

गणेश इंपेरिया हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन संतोष कणसे म्हणाले, की “आमचा सुका कचरा 2 ते 3 दिवस मनपाने नेला नसल्याने तो साठवून ठेवला आहे. आमच्याकडे तेवढा कचरा साठवून ठेवायला जागा व बीन्स नाहीत. आम्ही आमचा ओला कचरा आमच्या ठेकेदाराला देतो. त्यामुळे मनपाने सुका कचरा तरी नियमितपणे उचलावा.”

पिंपरी चिंचवड हाऊसिंग फेडेरेशनचे चेअरमन दत्तात्रय देशमुख म्हणाले, की “मनपाने सर्व हाऊसिंग सोसायटींचा कचरा दिवसा दररोज नियमित्तपणे उचलावा, ज्यामुळे सोसायटींना त्रास होणार नाही.”

सिल्वर स्काय स्केप्स हाऊसिंग सोसायटीचे मॅनेजिंग कमिटीचे सभासद तुषार सिद्दाम म्हणाले की, “आमची हाऊसिंग सोसायटी वाकडमध्ये असून त्यामध्ये 200 हून अधिक फ्लॅट्स आहेत. गेली दोन दिवस ओला व सुका कचरा मनपाने उचलून नेला नाही. त्यामुळे तो बीन्समध्ये साठवून ठेवला आहे. आजचा कचरा ठेवायला बीन्स नाहीत. मनपाने दररोज नियमित कचरा न्यावा अशी आमची मागणी आहे.”
अजय चारठणकर (सहाय्य्क आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका) यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.