Pimpri News : 26/11 च्या शहिदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी पिंपरी चिंचवड ते गेट ऑफ इंडिया सायकल फेरी

एमपीसी न्यूज – सायकलप्रेमी असलेल्या शहरातील युवक व युवतींनी एकत्र येऊन 26/11 तील शहिदांना आज मुकाई चौक ते गेट ऑफ इंडिया हे अंतर सायकलवरून पार करत श्रध्दांजली वाहिली.

गुरूवारी (दि.25) रात्री साडेदहा वाजता रावेत येथील मुकाई चौकापासून या सायकल फेरीला सुरूवात झाली. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हिरवा झेंडा फडकावून या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. ‘ट्रीब्युट सायकल राईड फाॅर द रियल हिरोज् 26/11’ असे या यात्रेला नाव देण्यात आले होते.

‘इको पेडलर्स’ यांनी आयोजित केलेल्या या सायकल यात्रेमध्ये 75 जणांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये 15 युवती व महिलांचा सहभाग होता. पिंपरी चिंचवडमधील ‘ आपलं पुणं सायक्लोथाॅन, हंटर ग्रुप ( चिंचवड), पुणे मॅरेथाॅन आणि अकलूज येथील राॅयल रायडर या संघटनेचे प्रतिनिधी देखील यामध्ये सहभागी झाले होते.

आज ( शुक्रवारी) पहाटे पाच ते साडेआठच्या सुमारास सर्वजण टप्प्याटप्प्याने गेट ऑफ इंडियाजवळ पोहोचले. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत शहिदांना श्रध्दांजली वाहिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.