Pimpri: महापालिकेतर्फे विशेष स्वच्छता मोहीम ; दोन टन कचरा उचलला

एमपीसी न्यूज – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वछता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत दोन टन कचरा उचलण्यात आला.

पिंपरी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन या मोहिमेचा प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामधील मैदानाची स्वच्छता करुन रस्त्याच्या दोन्ही बाजूचे फुटपाथ साफ करण्यात आले. त्यानंतर गोकुळ हॉटेल रस्ता, इंदिरा गांधी उडडाणपुलाचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

पिंपरीतील शगून चौकापासून डिलक्स थिएटर चौकापर्यंत सर्व पदाधिकारी, नगरसदस्य, अधिकारी व कर्मचारी आणि सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष परिसराची साफसफाई करुन सहभाग घेतला. सदर स्वच्छता मोहिमेअंतर्गत सहा टाटा एस या वाहनामधून दोन टन कचरा उचलण्यात आला.

स्वच्छता मोहिमेत महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह यांच्यासह प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या सीमा सावळे, आशा धायगुडे – शेंडगे, अश्विनी बोबडे, प्रियंका बारसे, नगरसदस्य, विलास मेडीगेरी, शीतल शिंदे, रवी लांडगे, नामदेव ढाके, स्वीकृत सदस्य मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, माउली थोरात, सागर हिंगणे, दिनेश यादव, विठठल भोईर, माजी महापौर आर.एस. कुमार, माजी नगरसदस्य विजय लांडे, राजेश पिल्ले, माजी नगरसदस्या उमा खापरे, सामाजिक कार्यकत्या वैशाली खाडे, शैला मोळक, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, आशादेवी दुरगुडे, आशा राऊत, सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे, अमोल थोरात, महेश कुलकर्णी, दीपक मोढवे,रणजीत इंगळे, संजय मंगोडेकर, देवीदास पाटील, रघुनंदन घुले यांचे सह विविध संस्थानचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.