Pimpri News : भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचलं पाहिजे आणि सर्वानी ते आत्मसात करायला हवं – धम्मराज साळवे

एमपीसी न्यूज : 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान तयार करण्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. संविधानामुळे भारतीय नागरिकांना आपले हक्क आणि अधिकार मिळाले. (Pimpri News) या संविधानामुळे आपल्याला स्वतंत्र देशातील स्वतंत्र नागरिक असल्याची भावना निर्माण होते. संविधानात दिलेले मुलभूत अधिकार आपली ढाल बनून आपल्याला हक्क देतात. त्याचप्रमाणे यामध्ये दिलेल्या मुलभूत कर्तव्य आपल्याला जबाबदारीची जाणीव करुन देतात भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिका पर्यंत पोहचलं पाहिजे आणि सर्वानी ते आत्मसात करायला हवं ,रयत विद्यार्थी विचार मंच माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत संविधान पोहचवू असे मत संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी व्यक्त केले.

पिंपरी येथील भीमसृष्टी मध्ये संविधान दिनाच्या निमीत्ताने रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे ,शहराध्यक्ष मयूर जगताप आणि महामानव भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ,भीमसृष्टीतील संविधानाच्या परस्ताविकेच्या कोनशिला समोर रयत विद्यार्थी विचार मंच पदाधिकारी सदस्य ,विद्यार्थी यांनी सामूहिक प्रास्ताविका वाचन केले . तसेच समता सैनिक दल आयोजित चित्रकला स्पर्धा विजेता विद्यार्थ्यांना संविधान प्रास्ताविक प्रतिमा देण्यात आल्या . तसेच महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील , अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांचा संविधान प्रास्ताविक प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

Bhosari News : अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी यांच्या स्मरणार्थ पुष्पचक्र समर्पण

यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच पदाधिकारी सदस्य संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे ,महासचिव संतोष शिंदे ,सहसचिव भाग्यश्री आखाडे , संघटक रोहित कांबळे , शहर उपाध्यक्ष समाधान गायकवाड ,सचिव योगेश कांबळे , सचिव प्रगती कोपरे , स्वराज कांबळे ,माधवी खरात इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.