Pimpri Corona Update: कोरोनाचा कहर सुरुच! शहरात आज नवीन 817 रुग्णांची नोंद, 22 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. शहराच्या विविध भागातील 817 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 22 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे शहरातील एकाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 526 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 81 हजार 329 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 2 हजार 162 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 880 रुग्ण गृहविलगीकरणात असून 282 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 48 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 317 आहेत. आज दिवसभरात 5 हजार 185 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 30 लाख 18 हजार 682 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.