Pimpri Crime : शिळे अन्न देत विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – सासरच्या लोकांनी (Pimpri Crime) विवाहितेला शिळे अन्न खायला देत तसेच उपाशी ठेवून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. हा प्रकार मार्च 2021 ते 29 ऑगस्ट 2022 या कालावधीत खराळवाडी पिंपरी येथे घडला.

याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासरे अशोक सखाराम चव्हाण (वय 64), पती आकाश अशोक चव्हाण (वय 32), दीर आतिश अशोक चव्हाण (वय 31), सासू (वय 50), ननंद (वय 30, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : दुचाकीस्वार महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना (Pimpri Crime) तुला स्वयंपाक व घरातील इतर कामे नीट करता येत नाहीत, असे म्हणत वेळोवेळी शिवीगाळ दमदाटी करत हाताने मारहाण केली. फिर्यादीला नाष्टा आणि जेवणाकरिता शिळे अन्न खायला दिले. दुपारचे जेवण दिले नाही. तसेच, उपाशीपोटी ठेवून फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.