Maval : अपहरण करून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – महिलेला शिवीगाळ (Maval) मारहाण करत तिचे अपहरण केले. तसेच तिच्याशी लग्न करण्याची मागणी करत बदनामी करण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 30) सकाळी चांदखेड ते कासारसाई मार्गावर मावळ येथे घडली.

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन खंडू शेळके (वय 40, रा. चांदखेड, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Crime : शिळे अन्न देत विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या पाच जणांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Maval) चांदखेड गावातील एका घरात धुणे भांड्याचे काम करतात. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी धुणे भांड्याचे काम करत असताना आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने कारमधून पळवून नेले. आरोपीने त्याच्याशी लग्न करण्याची फिर्यादीकडे मागणी केली. लग्न न केल्यास फिर्यादी सोबतचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. तसेच पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याचीही आरोपीने धमकी दिली. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.