Yerawada : थेट कारागृहातून आरोपीने तरुणीला लिहिली चिठ्ठी

एमपीसी न्यूज – कारागृहातून (Yerawada) एका आरोपीने तरुणीला चिठ्ठी लिहिली. ही घटना 25 ऑगस्ट रोजी सकाळी तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली आहे. शिवम विनोद शेळके (वय 21, रा. तळेगाव दाभाडे) असे आरोपीचे नाव आहे. तो सध्या येरवडा कारागृहात आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 42 वर्षीय आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 30) फिर्याद दिली आहे.

Maval : अपहरण करून महिलेचा विनयभंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्क येरवडा (Yerawada) कारागृहातून फिर्यादी यांच्या सतरा वर्षीय मुलीला चिठ्ठी लिहून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, यामुळे भीतीचे वातावरण निर्माण केले. कारागृहातूनही आरोपीला चिठ्ठी लिहून धमकी देऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.