Pimpri Crime : किरकोळ कारणावरून शेजाऱ्याकडून घरात घुसून मारहाण

एमपीसी न्यूज – कचऱ्याचा डब्बा दारात का ठेवला यावरून झालेल्या वादातून शेजाऱ्यांनी थेट घरात घुसून एकाला मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.1) दुपारी दोनच्या सुमारास संत तुकाराम नगर (Pimpri Crime) येथे घडली.

या प्रकरणी उद्धव श्रीकृष्ण सोमाणी (वय 38 रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली असून अमन अयाज शेख (वय 18) व 65 वर्षीय महिलेवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News : वाहतूक पोलिसाशी वाद घालणारे दोघे ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे (Pimpri Crime) वडील व महिला आरोपी यांच्यात सकाळी कचऱ्याचा डब्बा दारात ठेवण्यावरून भांडण झाले. याच रागातून अमन हा फिर्यादीच्या घरात घुसला व त्याने फिर्यादीच्या कपाळावर लोखंडी फायटर मारून जखमी केले. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.