Pimpri Crime : अल्पवयीन मुलीला लग्नाच्या आमिषाने पळवले

एमपीसी न्यूज : पिंपरी (Pimpri Crime) येथे 14 वर्ष वयाच्या मुलीला फूस लावून पळवण्यात आले. यासंदर्भात तिच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. याप्रकारणी ओळखीचा मुलगा प्रेमाशंकर हा आरोपी आहे. त्याला अजून अटक करण्यात आली नाही.

ही घटना 12 जून रोजी (Pimpri Crime) दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. मुलीला तिच्या राहत्या घरातून फूस लावून पळवण्यात आले आहे. तिच्या ओळखीचा मुलगा प्रेमाशंकर याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्या परवानगीशिवाय फूस लावून पळवण्यात आले आहे. या प्रकारणी 15 जून रोजी आरोपी विरोधात भा. द. वि कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.